मानसिक स्वास्थ्यावरही टेकफेस्टचा जुगाड!

मानसिक स्वास्थ्यावरही टेकफेस्टचा जुगाड!

टेकफेस्ट म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केलेले नवीन नवीन रोबोट, गाड्या आणि तोंडात बोटं घालायला लावणारे नव-नवीन शोध. अगदी रोजच्या भाषेत सांगायचे झाले तर जुगाडूंची दुनिया! यंदाच्या टेकफेस्टमार्फत समाजातील मानसिक विकाराने ग्रस्त असणाऱ्यांची मदत केली जाणार आहे. देशातील ४१ शहरांमधून १०० ठिकाणच्या अनेक एनजीओंनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तर दुसरीकडे सोलार एम्बेसेडरसाठी देखील टेकफेस्टच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी या सोलार लॅम्प मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करणे अपेक्षित आहे.

टेकफेस्ट 2018ची थीम

१४ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान यंदाच्या टेकफेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या आयआयटी टेकफेस्टची थिम टाईमलेस लॅप्स ही आहे. या थीमच्या निमित्ताने तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीपासून ते भविष्यातील तंत्रज्ञान असा आढावा घेण्यात येईल. सुरूवातीच्या काळातील तंत्रज्ञान कसे होते? काळानुसार या तंत्रज्ञानात कसे बदल होत गेले? तसेच भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये कसे बदल अपेक्षित आहेत? याची मांडणी या टेकफेस्टच्या निमित्ताने करण्यात येईल.

टेकनॉरीयॉन

टेकफेस्टचा भाग असलेले टेकनॉरीयॉन यंदा पाच शहरांमध्ये असेल. मुंबई, बंगळुरू, जयपूर, भोपाळ आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये झोननुसार विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि मेन्टॉरशीप सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या टेकनॉरीयॉनमध्ये सहभागी होता येईल. विजेत्यांना अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

यंदाचे आकर्षण

१. इंटरनॅशनल रोबोटिक्स चॅलेंज

गेल्यावर्षी झोनल स्पर्धेत बांगलादेशच्या टीमने अंतिम फेरीपर्यंत प्रवेश मिळवल होता. इजिप्त, सिरीया या देशांमधूनही टीम्सने रोबोटिक्सच्या स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. यंदाच्या टेकफेस्टमध्ये रोबोवॉरसाठी 3 लाखांच बक्षीस आहे.

2. इंटरनॅशनल कोडींग चॅलेंज

आंतरराष्ट्रीय कोडर्सपासून ते नवशिक्या कोडर्सपर्यंत हे इंटरनॅशनल कोडिंग चॅलेंज असणार आहे. या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम 1 लाख रूपये असेल.

3. इंटरनॅशनल रोबोवॉर

रोबोवॉर म्हणजे टेकफेस्टचा सर्वात लोकप्रिय असा स्पर्धेचा प्रकार आहे. जगभरातले सात देश या स्पर्धेच्या निमित्ताने यंदा सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत गतवर्षी चीन, रशिया, बांगलादेश, ब्राझील यासारख्या देशांनी सहभाग घेतला होता. यंदा इंटरनॅशनल झोनल्सची तयारी करण्याचेही टेकफेस्टच्या टीमने नियोजन केले आहे. महाकाय अशा ३६० डिग्री एरेनामध्ये टेकफेस्टच रोबोवॉर होईल.

टेकफेस्ट वर्ल्ड MUN

वर्ल्ड MUN हा आयआयटी टेकफेस्ट आणि संयुक्त राष्ट्राच्या विविध अशा 12 समित्यांचा एकत्रित असा पुढाकार आहे. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. परिसंवाद, चर्चासत्र, इंटरएक्टींग आणि सोशलायजिंग सेसन्शही यानिमित्ताने आयोजित करण्यात येतात. पोलंड, मलेशिया, इटली, पोलंड अशा विविध 20 देशांचे 600 प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात. या स्पर्धेसाठी 3 लाख रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

First Published on: July 29, 2018 4:43 PM
Exit mobile version