साकेत उड्डाणपुलाजवळ भरधाव टेम्पोला अपघात

साकेत उड्डाणपुलाजवळ भरधाव टेम्पोला अपघात

अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत उड्डाणपुलाजवळ टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात भरधाव टेम्पो उलटल्याने चालक केबिन मधील टेम्पोचालक आणि क्लिनर हे अडकले. त्यांची सुटका पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांना करण्यात यश मिळालं. दोघांना कळव्याच्या रुग्णालयात पाठविल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.

टेम्पोत चालक, क्लिनर केबिनमध्ये अडकले

मंगळवारी सायंकाळी भिवंडीवरून माल घेऊन मुंबईच्या दिशेला भरधाव वेगाने निघालेल्या टाटा टेम्पो क्र. एमएच ०४ एफपी २३३१ याला अपघात घडला. यात चालक राम नारायण जैस्वार आणि क्लिनर अमित हे जखमी झाले. साकेत उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. टेम्पोच्या चालक केबिनमध्ये जैस्वार आणि अमित अडकले. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची टीम एक रुग्णवाहिका, एक रेस्क्यू व्हॅन, एक हायड्रो क्रेन, एक टोविंग व्हॅनसह घटनास्थळी पोहचले. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोघांची सुटका करण्यात आली. जैस्वार आणि अमित यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चालक जैस्वार याला किरकोळ जखमी झाला आहे. तर क्लिनर अमित याच्या डाव्या पायाला दुखापत झालेली आहे.

First Published on: November 13, 2019 8:45 AM
Exit mobile version