मुंबई लोकलसाठी फॉलो करावा लागणार ‘चेन्नई पॅटर्न’

मुंबई लोकलसाठी फॉलो करावा लागणार ‘चेन्नई पॅटर्न’

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. तसेच मार्च महिन्यापासून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, अनलॉकच्या प्रक्रियेत ही लोकल टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे. सर्वप्रथम ही लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली. त्यानंतर महिलांना देखील लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता जर मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करायची असेल तर यासाठी चेन्नई पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे चेन्नई पॅटर्न?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेने तीन टप्प्यांत प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली होती. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ डिसेंबर २०२० रोजी गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.

मुंबई लोकल प्रवासाचे पर्याय


हेही वाचा – मुंबईकर घाबरले! चिकन सोडून भाज्यांच्या दुकानात धाव


 

First Published on: January 12, 2021 4:08 PM
Exit mobile version