ठाकरे सरकार वर्षपूर्ती : उद्धव ठाकरे सपशेल फेल – अविनाश जाधव

ठाकरे सरकार वर्षपूर्ती : उद्धव ठाकरे सपशेल फेल – अविनाश जाधव

उद्धव ठाकरे सरकारच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीमध्ये एकही ठोस काम हे मुख्यमंत्र्यांनी  संपुर्ण वर्षभरात केलेल नाही. कोरोनाच्या काळात महामारीवर नियंत्रण मिळवण्याचे काम तर उत्तराखंड आणि लडाखमध्येही झाले. पण संपुर्ण वर्षभरात एकही अस काम नाही जे या सरकारच यश म्हणून आठवेल. म्हणूनच हे सरकार एक वर्षांच्या कामगिरीला सपशेल फेल झाले असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. माय महानगरच्या खुल्लम खुल्ला या चर्चासत्रात ते महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बोलत होते. याआधीच्या फडणवीस यांच्यासोबतच्या सरकारमध्येही उद्धव ठाकरे होते. आता फक्त महाविकास आघाडीचे नेतृत्व ते करत आहेत. पण त्यांच्या नेतृत्वात कोणताही वेगळापणा दिसला नाही.

आगामी ठाणे महापालिका निवडणूका डोळ्यासमोर लक्षात ठेवून मनसेही तयार करत आहे. आगामी कालावधीत ठाणेकरांना पर्यटनासाठी येऊरच जंगल, पाणी पुरवठा करणारे स्वतःच असे धरण, रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू होणार नाही अशी रस्त्यांची व्यवस्था तसेच राहण्यासाठी चांगल्या इमारती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. याआधीही आम्ही २०१७ मध्ये डिजिटल अजेंडा जाहीर केला होता. पण येत्या ठाणे महापालिका निवडणूकांमध्ये जो येईल तो मनसेचाच येईल असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. ठाण्यात आजही किसन नगरमध्ये जुन्या इमारतीत लोक जीव मुठीत घेऊन झोपतात. तर रस्त्यात बाईक रायडर्सचे अपघात होऊन मृत्यू होतात. ठाण्याची तीन हजार कोटींची मुंबई महानगरपालिका आहे, पण तरीही ठाण्यातले खड्डे हे महापालिकेला बुझवता येत नाहीत ही खंत आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, आमदार शिवसेनेचे, मतदारसंघ शिवसेनेचे पण तरीही ठाणेकरांचा रस्त्याचा विषय सुटत नाही अशी टीका त्यांनी केली. ठाणे म्हणजे तलावांच शहर म्हणून ओळख, पण ती ओळखदेखील आपल्याला टीकवता आलेली नाही. ठाण्याला इतक्या वर्षांनंतरही स्वतःचे पाण्यासाठीचे धरण नाही, आजही भाडेतत्वावर पाणी घेऊन पाणी घेण्याची स्थिती ठाणेकरांवर आहे. त्यामुळे मनसेचे ठाण्यातले काम पाहूनच आगामी निवडणूकांमध्ये कल हा मनसेलाच असेल. यापुढे ठाण्यात राजसाहेबांना कोणी फसवणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 

First Published on: November 27, 2020 4:28 PM
Exit mobile version