ठक्कर बाप्पा योजनांची ३०० कामे रखडली

ठक्कर बाप्पा योजनांची ३०० कामे रखडली

Thakkar Bappa Yojana

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत होत असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील अनेक प्रस्तावित विकासकामे रखडली असून यामुळे आदिवासी गावपाड्यांमधील जनतेला या कामाच्या सुविधा व विकासांपासून वंचित राहत आहेत.
आदिवासी विकास विभागामार्फत शंभर टक्के आदिवासी गाव-पाड्यांमध्ये ठक्कर बाप्पा(आदिवासी वस्ती सुधार योजना) या योजनांतर्गत अंतर्गत रस्ते, विहिरी, समाज हॉल आदी विकासकामे केली जात आहेत. मात्र, सद्यस्थितीत आदिवासी विकास विभागाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने व काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्रस्तावित कामे प्रलंबित आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करावयाची असलेली ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सन 2018-019 मधील 494 विविध कामे प्रस्तावित असून यामधील 194 कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित जवळपास 300 पर्यंतची ही कामे निधीची कमतरता, काही तांत्रिक बाबी कारणास्तव अद्याप रखडलेली आहेत. त्यामुळे अशा ग्रामीण भागातील आदिवासी गाव-पाड्यांमधील जनता या सुविधा आणि विकासकामांपासून वंचित आहे.

संबंधित प्रकल्प कार्यालयार्तंगत प्रस्तावित ठक्कर बाप्पा योजनेच्या कामांना पुरेसा निधी मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य स्तरीय आदिवासी विकास विभाग आढावा समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
– अशोक इरनक (अध्यक्ष, प्रकल्प स्तरीय आढावा व नियोजन समिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर )

First Published on: July 22, 2019 4:30 AM
Exit mobile version