ठाणे, नवी मुंबईत एक हजाराचा टप्पा पार; नवीन २८९ रूग्णांची नोंद

ठाणे, नवी मुंबईत एक हजाराचा टप्पा पार; नवीन २८९ रूग्णांची नोंद

देशभरात लागू करण्यात आलेल्या तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत रविवार १७ मे रोजी संपत आहे. मात्र तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्येने तीन हजार ४३२ तर ठाणे नवी मुंबईत एक हजार रूग्णांचा टप्पा ओलांडला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक २८९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३ हजार ४३२ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९४ नवीन रूग्णांची नोंद झाली, त्यामुळे ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजार ९० झाली आहे. त्याखालोखाल नवी मुंबईत ८० रूग्ण आढळून आल्याने रूग्ण संख्या एक हजार १२८ वर पोहोचली आहे तर कल्याण डोंबिवलीतही सर्वाधिक ३५ रूग्ण आढळून आल्याने रूग्ण संख्या ४५९ झाली आहे.

मीरा भाईंदरमध्ये २१ रूग्ण आढळून आल्याने रूग्ण संख्या ३१२ झाली आहे तर उल्हासनगरमध्ये १२ रूग्ण आढळून आल्याने रूग्ण संख्येने शंभरी पार केली आहे. तर बदलापूरमध्येही १९ रूग्णांची भर पडल्याने रूग्ण संख्या शंभरीच्या जवळ येऊन ठेपली आहे. अंबरनाथमध्ये एक रूग्ण आढळून आल्याने रूग्ण संख्या ३३ झाली आहे. ठाणे ग्रामीण परिसरातही रूग्णांची संख्या वाढत असून शनिवारी २४ रूग्ण आढळून आल्याने ग्रामीण परिसरातील रूग्ण संख्या १६५ झाली आहे.

First Published on: May 16, 2020 10:52 PM
Exit mobile version