Coronavirus: ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण

Coronavirus: ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण

Coronavirus: ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरणCoronavirus: ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शीप्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.

१४० कर्मचारी या कामासाठी केले तैनात 

करोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रामध्ये फुटपाथ, विविध मार्केटस, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट, फिश मार्केट, गर्दीची ठिकाणे आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून ट्रॅक्टर्स १०, स्प्रेईंग मशीन्स ८०, अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि जवळपास १४० कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४ वरून ८९वर

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर पोहोचली आहे. यामध्ये तब्बल १४ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले असून एक रुग्ण पुण्यामध्ये आढळला आहे. तसंच मुंबईत आणखी एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसंच जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांहून अधिक झाली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कारवाई करा – केंद्राचे आदेश


 

First Published on: March 23, 2020 12:57 PM
Exit mobile version