ठाण्यात होणार कृत्रिम तलावात छटपुजा

ठाण्यात होणार कृत्रिम तलावात छटपुजा

Artificial lake

ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने छटपुजेसाठी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे. छटपुजेवरून ठाण्यात होणारा वाद वाढू नये यासाठी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप गिरीधर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही उपाययोजना केली आहे. पोलिसांनी बनवलेल्या कृत्रिम तलावातच प्रदूषणमुक्त छटपूजा करण्यात येणार असल्याने मनसेचा विरोध काहीसा प्रमाणात मावळला आहे.

छटपूजेनंतर निर्माल्य पाण्यात सोडले जाते. या निर्माल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. याप्रश्नावर मनसे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. त्यामुळे दरवर्षी हा वाद विकोपास जातो. हा वाद थांबवण्याकरिता वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही वेगळी संकल्पना राबवल्यामुळे याचे ठाणे मनसेसह सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

कायद्याचे पालन करणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच वाद उद्भवू नये यासाठी प्रयत्न करणे हे देखील महत्वाचे आहे. छटपूजेचा वाद वाढू नये म्हणून प्रयत्न करत कृत्रिम तलाव उभारला आहे. गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय लोकांच्या विरोधात वातावरण पेटले होते. त्यातून अनेकदा मारहाणीचे प्रकार देखील झाले आणि शेवटी केंद्रीय गृह खात्याला दखल घ्यावी लागली होती. असा प्रकार घडू नये म्हणून हा उपाय करण्यात आला आहे.
– प्रदिप गिरीधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस स्टेशन

First Published on: November 13, 2018 4:27 AM
Exit mobile version