ठाण्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांची सर्रास विक्री

ठाण्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांची सर्रास विक्री

ठाण्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांची सर्रास विक्री

पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यास बंदी असतानाही ठाण्यात हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे या उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांवर पालिकेकडून कधी कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी

ठाणे स्टेशन परिसर, कोपरी पूर्व, खोपट, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर आदी परिसरात हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे. अनेक हातगाड्या या गटाराशेजारीच असून पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखली जात नाही. पाण्याची साठवणूक केली जाते. त्यामुळे साथीच्या आजारांचा शिरकाव होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच डेंग्यूमुळे एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेने कारवाई केल्यानंतरही हातगाड्या पुन्हा उभ्या राहत असतील तर त्या गाड्या जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी व जंतूनाशक फवारणी केली जात असल्याचे सांगितले. मात्र नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली

डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

ठाणे शहरात जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत ७८ जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यात ८३ संशयित रूग्ण आहेत. डेंग्यूमुळे एकाला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती पालिकेकडून मिळाली.

First Published on: July 18, 2019 8:35 PM
Exit mobile version