ठाणे महापालिका आता ट्विटर आणि फेसबूकवर

ठाणे महापालिका आता ट्विटर आणि फेसबूकवर

ठाणे मनपाच्या ट्विटर व फेसबुक पेजचे उद्घाटन

”ठाण्यातील जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात तसेच लोकप्रतिनिधींना देखील नागरिकांच्या समस्येचा निपटारा तातडीने करण्याकरिता ठाणे महापालिकेच्या ट्विटर अॅप व फेसबुक पेजचा ठाणेकरांना निश्चितच फायदा होणार आहे. तसेच या माध्यमातून ठाणेकर जनतेचा आवाज बुलंद होण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले. ठाणेकर नागरिकांना आजपासून फेसबुकवरील Thane Municipal Corporation या फेसबुकपेजचा तसेच @TmcATweetAway या ट्विटर हॅन्डलचा वापर करता येणार आहे.

महापालिकेच्यावतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या ट्विटर व फेसबुक पेजचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

हेही वाचा – डॉक्टरांना सुरक्षित काम करू द्या, डॉक्टर-प्राध्यापकांची मागणी

ठाणेकरांना होणार फायदा – एकनाथ शिंदे

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ”ठाणेकर नागरिकांसाठी एक नवे माध्यम महापालिकेने सुरु केले असून या उपक्रमाचा नागरिकांना त्यांच्या समस्या, सूचना प्रशासनापर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले असून लोक प्रतिनिधींना देखील या माध्यमातून आपल्या विभागातील तसेच शहरातील घडामोडीची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे. तरी नागरिकांनी या माध्यमाचा सुयोग्य वापर करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, ”ट्विटर व फेसबुक ही समाजमाध्यमे संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. ठाणे महापालिकेने कार्यान्वित केलेल्या या सोशल माध्यमाचा नागरिकांना फायदा होणार असून महापालिकेने केलेलं हे कार्य कौतुकास्पद आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आदित्य ठाकरेंच्या हस्ते युवकाचा सत्कार

ठाणे महापालिका व सामान्य नागरिक यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होवून नागरिकांना त्यांच्या समस्या, सूचना थेट प्रशासन तसेच पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहचविण्यात याव्यात म्हणून या सोशल माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान ‘स्टुडन्ट इंटरप्रीटीया ऑफ द इयर फ्रॉम आशिया’ हा सन्मान पटकावल्या बद्दल ठाण्यातील अर्जुन देशपांडे या १७ वर्षीय युवकाचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

First Published on: July 23, 2019 9:10 PM
Exit mobile version