अंधेरी येथे सिनेअभिनेत्रीच्या सतरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग

अंधेरी येथे सिनेअभिनेत्रीच्या सतरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग

सुधागड तालुक्यात एक कोटी १४ लाखांचा दरोडा

अंधेरी येथे एका सिनेअभिनेत्रीच्या सतरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच अभिनव मेहता या 34 वर्षांच्या आरोपीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशी येथील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सकाळी घडलेल्या या विनयभंगाच्या घटनेने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सतरा वर्षांची ही तरुणी अंधेरी येथे राहत असून ती एका सिनेअभिनेत्रीची मुलगी आहे.

मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे अंधेरीतील लोखंडवाला, जॉगिंग पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी तिला तिचा एक व्यक्ती पाठलाग करीत असल्याचे दिसून आले, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर ती व्यक्ती तिच्याजवळ आली आणि त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. घडलेला प्रकार तिने नंतर ओशिवरा पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध 354 ए, 509 भादवी सहकलम 12 पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

First Published on: December 7, 2019 1:18 AM
Exit mobile version