पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

गिरीश माने (रुग्ण) - वोक्हार्ट हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर

मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांना पित्ताशयामधील सर्वात मोठी गाठ काढण्यात यश आलं आहे. संबंधित रुग्णायच्या पित्ताशयामध्ये तब्बल १ फूट २ इंच लांबीची गाठ झाली होती. मात्र, वोक्हार्टच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत ही गाठ बाहेर काढली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगामध्ये इतकी मोठी गाठ असलेला हा आठवा रुग्ण असल्याचा दावा, रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.  भाईंदरमध्ये राहणारे ५८ वर्षीय गिरीश माने यांना गेली पोटात दुखत होतं. गॅस, अपचन किंवा जंतुसंसर्ग आहे असं समजून त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून अनेक वेळा उपचार घेतले होते. मात्र, कुठल्याच उपचारांनी त्यांच्या दुखण्यामध्ये जराही फरक पडला पडत नव्हता.

साधारण २० वर्षांपूर्वी त्यांनी सोनोग्राफी केली असता त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयाला थोडीशी सूज आल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र, माने यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान गेल्या महिन्यात पोटाचं दुखणं जास्तच वाढल्यामुळे त्यांनी मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. वोक्हार्टमध्ये माने यांनी पोट आणि आतड्यांचे तज्ज्ञ – एचपीबी शल्य विशारद डॉ इमरान शेख यांची भेट घेतली. डॉ. इमरान यांनी त्यांना वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला. सीटीस्कॅन केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये एक मोठी गाठ आढळून आली. पुढे जाऊन एमआरआय केल्यानंतर ती गाठ पित्ताशयात असून त्याची लांबी १ फूट २ इंच (३६ सेमी) इतकी असल्याचं समोर आलं. या गाठीमुळे माने यांच्या पित्ताशयाचा आकारही वाढून १ फूट २ इंचाचा झाला होतो. सामान्यपणे सर्वसाधारण माणसाच्या पित्ताशयाचा आकार हा ५ ते ६ सेमी इतकाच असतो.

पित्ताशयातून काढलेली १ फूट २ इंचाची गाठ

 

First Published on: July 19, 2018 6:18 PM
Exit mobile version