दाभोलकर -पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने फटकारले

दाभोलकर -पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने फटकारले

मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सध्या तपास यंत्रणेतील अधिकारी आणि दाभोलकर-पानसरे कुटुंबीय हे वारंवार माध्यमांसमोर जाऊन तपासात मिळालेले पुरावे उघड करत आहेत, हे आम्हाला अजिबात पसंत नाही. दाभोलकर -पानसरे कुटुंबियांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा गैरफायदा घेऊ नये, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने गुरुवारी सुनावले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली.

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या हत्येसंबंधी सतत माध्यमांसमोर येऊन भाष्य करणार्‍या तपास यंत्रणांची हायकोर्टाने चांगलीच कानउघाडणी केली. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असताना विशेष तपास पथक (एसआयटी) सतत माध्यमांसमोर का जात आहे? हे योग्य नाही. पकडलेले आरोपी जर भविष्यात सुटले तर त्यांच्या आयुष्याचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत हायकोर्टाने तपास यंत्रणा आणि दाभोलकर-पानसरे कुटुंबीय यांना खडसावले. इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका, तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, नवीन आरोपी पकडले म्हणून आधीच्या आरोपींचा तपास न करण्याची चूक करू नका. त्यामुळे दिशाभूल केली जाऊ शकते. तसेच अतिउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असेही विशेष तपास पथकाला कोर्टाने सुनावले.

First Published on: September 7, 2018 3:30 AM
Exit mobile version