तिसर्‍या माळ्यावरून पडून 3 वर्षाचा मुलगा जखमी

तिसर्‍या माळ्यावरून पडून 3 वर्षाचा मुलगा जखमी

प्रातिनिधिक फोटो

नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या जागेत कोणत्याही सुरक्षेची सुविधा नसल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेतून तिसर्‍या माळ्यावरून खाली पडल्याने 3 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गाव परिसरात वैष्णवी संसार या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या डी विंग 304 मध्ये सुवर्णा तोरसकर या राहतात. मुंबई येथील घोडपदेव परिसरात राहणारी त्यांची नणंद रेणुका मुणुर्डेकर या त्यांचा 3 वर्षीय मुलगा अरुण याला घेऊन सुवर्णा यांच्याकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा खेळताखेळता लिफ्टच्या मोकळया जागेतून तिसर्‍या माळ्यावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीसउपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

First Published on: February 28, 2019 4:45 AM
Exit mobile version