कसारा ठाकूरवाडीतील सिमेंट रस्ता खचला

कसारा ठाकूरवाडीतील सिमेंट रस्ता खचला

संततधार कोसळणार्‍या पावसाच्या पाण्याने शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पायवाट रस्ता खचला आहे. त्यामुळे वाटसरुंना येजा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी विभागात दहा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला होता. त्यानंतर तीन वर्षात या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. या रस्त्याची दुरुस्त करण्यात यावी, यासाठी स्थानिकांनी मागील सात वर्षात ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. यंदाच्या पावसात तर हा रस्ता पूर्णपणे खचून त्याच्या खालचा दगड मातीचा ढिगारा खाली आला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही. तर पाटीलवाडी आणि ठाकूरवाडी विभागातील ग्रामस्थांना रेल्वे रूळ ओलांडून इच्छितस्थळ गाठावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांची मोठी कसरत
देऊळवाडी विभागात जिल्हा परिषदेची शाळा असून त्या शाळेत शिक्षण घेण्यार्‍या पाटीलवाडी आणि ठाकूरवाडीतील लहानग्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोसळलेल्या रस्त्यावरून जाणे हा एकमेव मार्ग विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यात हे विद्यार्थी चारपाच जणांच्या घोळक्याने एकमेकांना हात देऊन पायवाट काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी एखाद्या विद्यार्थ्यांचा पाय घसरून काही कमीजास्त झाल तर याला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित होत आहे.

First Published on: August 9, 2019 1:05 AM
Exit mobile version