मध्य रेल्वेच्या हेरिटेज गॅलरीत ऐतिहासिक इंजिनची भर

मध्य रेल्वेच्या हेरिटेज गॅलरीत ऐतिहासिक इंजिनची भर

RAIL ENGIN

वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असणार्‍या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेने प्रवास करणारे लाखो प्रवासी रोज भेट देत असतात. त्यात सर्वात जास्त प्रवाशांना आकर्षित करते ती म्हणजे मध्य रेल्वेची हेरिटेज गॅलरी. या हेरिटेज गॅलरीत ऐतिहासिक रेल्वे इंजिनची भर पडली आहे.भुसावळ विभागातून ७१७ एफ या क्रमांकाचे नेरॉगेच लोकोमोटिव्ह इंजिन आता या हेरिटेज गॅलरीत दिसणार आहे. याची इंजिनची निर्मिती १९२८ साली करण्यात आली होती. तेव्हापासून हे इंजिन भारतीय रेल्वेत आपली सेवा देत होते. भारतीय रेल्वेचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर यावा, म्हणून रेल्वेतर्फे सीएसएमटी रेल्वे स्थानकात हेरिटेज गॅलरीत हे ऐतिहासिक इंजिन समाविष्ट करण्यात आले आहे.

सीएसएमटी स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.१८ जवळील मोकळ्या जागेत हेरिटेज गॅलरी आली आहे. या हेरिटेज गॅलेरीत ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हॅण्ड ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर,प्रिंटिंग प्रेस मशीन अशा ऐतिहासिक मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत.सोबतच कुलाबा ते सीप्झ अशा भुयारी मेट्रो-३ साठी तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण या हेरिटेज गॅलरीत करण्यात आले आहे.

रेल्वेचा गौरवशाली इतिहास आजच्या पिढी माहीत व्हावा यासाठी ही गॅलरी सुरू करण्यात आली आहे. मुंबईला भेट देणार्‍या पर्यटकांना भारतीय रेल्वेचा इतिहास कळावा, भारतीय दळणवळणातील टप्प्यांची त्यांना माहिती व्हावी हा २०१० साली सुरू करण्यात आलेल्या या गॅलरीचा उद्देश आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या संकल्पनेतून सीएसएमटी स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.१८ जवळील मोकळ्या जागेत हेरिटेज गॅलरी सुरू करण्यात आली आहेत. या हेरिटेज गॅलरीत रेल्वेच्या ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एक भाग म्हणून भुसावळ विभागातून हे ७१७ एफ हे नेरोगेज स्टीम लोको इंजिन आणण्यात आली आहे.

ए. के. सिंह, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

First Published on: November 29, 2018 5:00 AM
Exit mobile version