आईच्या कुशीतून बाळाला पळवणारा गजाआड

आईच्या कुशीतून बाळाला पळवणारा गजाआड

केंद्राकडून एका कोरोनाबाधित रुग्णामागे मिळतायत दीड लाख रुपये? जाणून घ्या सत्य

भिवंडी येथील धाणकरनाका भाजीमार्केट परिसरात आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पसार झालेल्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. चंदुल रामप्यारे हरजन याचा एक वर्षीय मुलगा आईच्या कुशीत झोपला असता रोहित प्रदिप कोटेकर याने त्याचे अपहरण केले. यासंबंधी 3 जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

अधिक तपास करत असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी रोहित प्रदिप कोटेकर याच्यावर संशय आला. त्याला नदीनाका भिवंडी येथून 10 जून रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून या गुन्हात त्याचा साथीदार व रेकॉर्डवरील वाहन चोरी करणारा सूरज रमेश सोनी दोघांनी मिळून अपहरण केल्याची माहिती मिळाली. या बालकाला नेपाळ हद्दीला लागून असलेल्या गावात विक्री केले असल्याची कबुलीही त्याने दिली. यावर पोलिसाचे पथक तत्काळ मु.पो.एकसडवा. ता.कोल्हुई, जि.महाराजगंज, उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. तेथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने बालकाला ताब्यात घेण्यात आले. केवळ आठ दिवसात ठाणे पोलीस गुन्हे शाखेने ही कामगिरी यशस्वी केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आणि अपहृत बालकाला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

First Published on: June 14, 2019 4:20 AM
Exit mobile version