पावसाळ्यातील साथीच्या आजारांतही ‘चेस दि व्हायरस’चे सुत्र!

पावसाळ्यातील साथीच्या आजारांतही ‘चेस दि व्हायरस’चे सुत्र!

मुंबईत कोरोनाचा कहर सुरु असतानाच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंगी, मलेरिया तसेच लेप्टोच्या साथीच्या आजारांचेही प्रमाण भविष्यात वाढण्याची भीती लक्षात घेवून  महापालिका कोरोनातील ‘चेस दि व्हायरस’च्या सुत्राचाच अवलंब करणार आहे. कोरोनात तापाच्या दवाखान्यांमार्फत झोपडपट्टयांमधून ज्याप्रमाणे रुग्णांचा शोध घेतला, त्याचधर्तीवर पावसाळ्यातील साथीच्या आजारांमध्ये अशाप्रकारे आरोग्य शिबिर राबवून रुग्णांचा शोध घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व उपायुक्त व सहायक आयुक्तांना दिले आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर मलेरिया, डेंगी, लेप्टो असे आजार उदभवतात. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका सातत्याने सर्वस्थरीय उपाययोजना करीत असते. या उपाययोजनांचा आढावा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्हिडीओ काँन्फरन्सीद्वारे घेतला. यावेळी कोरोना मध्ये जसे आपण  ‘चेस द व्हायरस’  हे सूत्र घेऊन तापाचे दवाखाने अर्थात फिव्हर क्लिनीक्सच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला आणि शोध घेत आहोत. त्याच धर्तीवर पावसाळी आजारासाठी सर्व विभागात, सर्व झोपडपट्ट्यांमधून, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने वैद्यकीय शिबिर आयोजित करावेत. तसेच यात खासगी दवाखान्यांचे डॉक्टर्स मदत करायला तयार असतील तर त्यांचीही मदत घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

सर्व परिमंडळीय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी याबाबतचे नियोजन करून येत्या रविवारपासून हे शिबिर आयोजित करावेत, असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. या बैठकीला सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इत खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

First Published on: June 10, 2020 10:53 PM
Exit mobile version