मंकी हिलजवळ दरड कोसळली

मंकी हिलजवळ दरड कोसळली

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली. लोणावळ्याजवळील मंकी हिल येथे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची मुंबई – पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्रीच्य़ा सुमारास मंकी हिल जवळील दरडीचे दगड कोसळून ट्रॅकवर पडल्याने या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती.

ही दरड कोसळ्याने चेन्नई एक्सप्रेस ठाकूरवाडीजवळ थांबवण्यात आली होती. तसेच, डाऊन लाईन बंद करण्यात आल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दरड कोसळल्याने रखडल्या होत्या. ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ही दरड बाजूला हटवून तेथील वाहतूक पुर्ववत झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

First Published on: June 26, 2019 10:58 AM
Exit mobile version