मुंबईत रेबीजच्या रुग्णांची संख्या घटली

मुंबईत रेबीजच्या रुग्णांची संख्या घटली

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत रेबीजच्या रुग्णांची संख्या घटली असल्याचं एका माहिती अधिकारातून उघड झालं आहे. माहिती अधिकारातून सांगितल्याप्रमाणे, २००९ पासून ते २०१८ पर्यंत मुंबई शहरात रेबीजमुळे मृत्यू होण्याच्या संख्येतही घट झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी वेगवेगळ्या पालिकेच्या रुग्णालयातून रेबिजबाबत माहिती मागवली होती. त्या रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, २००९ ते २०१८ या दहा वर्षात १९ जणांना रेबिजमुळे मृत्यू झाला आहे.

माहिती अधिकारानुसार करण्यात आलेली मृत्यूची नोंद

चेतन कोठारीचं काय आहे म्हणणं?

” रेबीज हा आजार १०० टक्के रोखता येऊ शकतो. पण, त्यासाठी इंजेक्शन वेळच्यावेळी घेतले पाहिजेत. लोकांनी दुर्लक्ष करु नये. रेबिज झालेल्या व्यक्तींनी रुग्णालयाला भेट देऊन वेळच्यावेळी गोळ्या घेतल्या पाहिजेत. अनेकदा रुग्ण कोर्स पूर्ण करत नाहीत. त्यामुळे इंजेक्शन, गोळ्या , औषधोपचार नीट घेतले पाहिजेत. ”
चेतन कोठारी, आरटीआय कार्यकर्ते

काय आहे रेबीज?

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी, जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगात रोगी पाण्याला घाबरतो. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र, रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे.

रेबीजची लक्षणे

कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो आणि जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

२०१७ या वर्षात २४ हजार कुत्र्यांची केली नसबंदी

महापालिकेच्या श्वान पथकाने २०१७ या वर्षात २४ हजार कुत्र्यांची नसबंदी करुन लसीकरण केलेलं आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कुत्रा चावलेल्या व्यक्तीसाठी अॅंटी वॅसिनेशन उपलब्ध असतात. ज्यामुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला ते दिल्यानंतर बरं वाटू शकतं, अशी माहिती महापालिकेतील श्वान विभागाचे डॉ. शेटये यांनी दिली आहे.

First Published on: July 6, 2018 8:51 PM
Exit mobile version