या कारणांमुळे निष्पाप प्रिन्सचा मृत्यू; शवविच्छेदनातून झाले स्पष्ट

या कारणांमुळे निष्पाप प्रिन्सचा मृत्यू; शवविच्छेदनातून झाले स्पष्ट

प्रिन्स

केईएम रुग्णालयातील प्रिन्स राजभर या बालकाच्या मृत्यू हा रक्तातील जंतू संसर्ग (सेप्टिसेमिकशॉक), थर्मल बर्न तसेच जन्मजात हृदयरोग (एटरीयल सेपटल डिफेकट) यामुळे झाल्याची बाब समोर आली आहे. प्रिन्सच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्याच्या मृत्यूची ही कारणे नमूद केली आहेत. केईएम रुग्णालयातील बालरोग रुग्ण विभागात ६ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या प्रिन्स राजभर या चार महिन्याच्या बालकाचा ईसीजी मशिनच्या शॉटसर्कीटमुळे उजवा हात आणि कान भाजला. त्यानंतर हाताला गँगरींग झाल्यामुळे त्यांचा हात कापण्यात आला. ह्दयाला छिद्र असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु गुरुवारी मध्यरात्री या मुलाचे निधन झाले.

या मृत्युचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले. प्रिन्सच्या मृत्यूबाबत प्रशासनाने निवेदन करावे अशी मागणी स्थायी सदस्यांनी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी, प्रथमदर्शनी ही घटना अपघात असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणाची नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरु आहे. तसेच मशिनचे सर्व जळालेले भाग आणि गादीचे भाग न्यायवैद्यक प्रयोगशाळेने नेले आहेत. त्यामुळे दोन्हीचा अहवाल आल्यानंतर याचे प्रमुख कारण स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.

अहवालात प्रिन्सच्या मृत्यूचे कारण स्पष्ट

प्रिन्सच्या हाताला गॅंगरीन पसरू नये म्हणून ११ नोव्हेंबर रोजी त्यांचा हात कापण्यात आला.सुरुवातीचा एक आठवडा रुगणाची तब्येत स्थिर होती. परंतु त्यानंतर न्यूमोनिया आणि सेप्टि सेमियामुळे त्याची तब्येत बिघडली. दुर्दैवाने बाळाचा २१ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी ३ वैदयकीय विद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाच्या ३ विभाग प्रमुखांची समिती नेमण्यात व शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये बाळाचा मृत्यू हारक्तातील जंतू संसर्ग (सेप्टिसेमिकशॉक), थर्मल बर्न तसेच जन्मजात हृदयरोग (एटरीयल सेपटल डिफेकट) यामुळे झाल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – केईम रुग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू
First Published on: November 27, 2019 3:25 PM
Exit mobile version