एसटीची जिगरबाज मर्दानी

एसटीची जिगरबाज मर्दानी

अनिता पाटील

नोकरी माझी भाकरी, एसटी माझे घर आणि प्रवासी माझे परमेश्वर असे,उद्गार काढणारी दुसरी कोणी नाही. एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातील जिगरबाज मर्दानी अनिता पाटील आहेत. ज्यांनी एसटी कर्मचार्‍यांत संपकाळात एसटी कर्मचार्‍यांचा प्रचंड विरोध असताना सुध्दा एसटी प्रवाशांना सेवा दिली होती. त्यामुळे यंदा एसटी महामंडळाकडून त्यांच्या कार्यालयाची दखल घेण्यात आली आहे. पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.

9 जून 2017 रोजी राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले होते. एसटी डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. मात्र, एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातील अनिता पाटील या महिला वाहकाने आपल्या एका सहकारी महिलेला हाताशी धरून कुणालाही न जुमानता संपकर्‍यांची प्रचंड दहशत असताना सुध्दा कर्तव्याचा भाग म्हणून प्रवाशांच्या सुविधेसाठी कोल्हापूर ते पुणे या विनावाहक शिवशाही बससेवेसाठी बुकिंग करीत कर्तव्य बजावले व संपकाळात 51 फेर्‍या चालू ठेवण्यात महामंडळाला सहकार्य केले.

5 लाख 50 हजार रुपये महसूल एसटी महामंडळाला प्राप्त करून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत एसटी महामंडळ वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईतील गोकुळदास तेजपाल सभागृह येथे एका शानदार समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे संपाचे नेतृत्व करणारे ज्येष्ट कामगार नेते हनुमंत ताटे यांच्या साक्षीने व त्यांच्याच उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला आहे.

खडतर परिस्थितीचा सामना

महिला वाहक अनिता पाटील यांनी ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलाताना सांगितले की, 2010 पासून एसटी महामंडळात कार्यरत आहे. 2017 रोजी राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. त्यामुळे एकीकडे एसटी बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुण्याला जायचे होते. या संपाचा फायदा घेत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत होती. साधारण, कोल्हापूर ते पुणे एसटीची 430 रूपये तिकीट आहे. मात्र, संपाच्या काळात खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून 1200 ते 1300 रूपये लूट करण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय बघता येत नव्हती. त्यामुळे आम्ही संपकर्‍यांना न जुमानता चोख कर्तव्य बजावले. प्रवाशांच्या सुविधेसाठी बससेवेसाठी बुकिंग सुरू केले.

First Published on: October 1, 2019 5:34 AM
Exit mobile version