कब्रस्तानच्या भूखंडावर उद्यानाचे काम सुरु

कब्रस्तानच्या भूखंडावर उद्यानाचे काम सुरु

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

“ठाणे महानगर पालिका क्षेत्रात स्मशानभूमीच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून मानपाडा येथील कॉसमस लाऊंज गृह संकुलाजवळ आणि वर्तकनगर येथील रेप्टाकोस कंपनीच्या सुविधा भूखंडावरील प्रस्तावित तसेच मुंब्रा येथील स्मशानभूमींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मुंब्य्रात अनेकदा विविध ठिकाणी कब्रस्तानचे शुभारंभ झाले. मात्र कब्रस्तान मुंब्रावासियाना अद्याप मिळाले नाही. इतर स्मशानभूमिप्रमाणेच मुंब्रावासियांचे कब्रस्तानही अद्याप राजकारणात अडकले आहे. अनेक वर्ष मागणी केल्यानंतर कब्रस्तानची जागाही निश्चित करण्यात आलेली नाही. हा प्रश्न लवकरच सोडवण्यात आला नाही तर ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

कब्रस्तानची आवश्यकता असल्याने जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या देखरेखीत असलेला अडीच एकर तळ्याचा हेरीटेज प्लॉटवर कब्रस्तान बनवण्यात यावे, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. मुंब्रावासियांना पाच एकरचा प्लॉट हा कब्रस्तानसाठी शासनाने दिला होता. मात्र त्यावर अतिक्रमण झाले आणि प्लॉट गिळंकृत करण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत कब्रस्तानला भूखंड देण्यात आला नाही किंवा आरक्षितही करण्यात आला नाही. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करत त्याच जागेवर महापालिकेने कोट्यावधी रुपये मंजूर करून उद्यान बनवण्याचे काम सुरु केल्याने मुंब्रा परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंब्रा सर्व्हे क्र. ८४, ८५, ९० आणि ९६ लगतचा अडीच एकरच्या प्लॉटवर ब्रिटीश काळापासून तळे होते. याठिकाणी भूमाफियांनी तळे बुजवून अतिक्रमण केले. उर्वरित मोकळ्या अडीच एकर जागेची देखरेख १९९० पासून ट्रस्ट करत आहे. जर जमियतुल मुस्लिमीन ट्रस्ट या जागेवर दावा केला नसता तर हा भूखड भूमाफियांनी अतिक्रमण करून हडप केला असता, पण आता महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी उद्यान करत आहे.

मुंब्रा परिसरात खेळाचे मैदान, स्टेडीयम, कब्रस्तानसाठी भूखंडाची घोषणा झाली. सोल्टर हाउसची घोषणाही केली. पण प्रत्यक्षात मैदान आणि स्टेडीयम व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. कब्रस्तानची अनेक उद्घाटने झाली. पण कब्रस्तान आजवर मिळाले नाही, सोल्टर हाउस आरक्षण असलेली जागा काही प्रमाणात सीआरझेडने बाधित झाली तेही बारगळले. आता रिकाम्या भूखंडावर कब्रस्तान करा म्हणून मागणी होत आहे. तिथे उद्यान बनवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जर पालिकेने काम थांबवले नाही तर कोर्टात याचिका दाखल करू.
– शमीम एहसान, जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार

नुकतीच जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडली. त्यांनी मुंब्रा कब्रस्तान करता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र हा प्रश्न राजकारणात अडकला आहे. आज कब्रस्तानची गरज असताना जाणिवपूर्वक उद्यानाचे काम सुरु करण्यात आले आहे.
– नईम खान, माजी महापौर

First Published on: January 14, 2019 5:55 AM
Exit mobile version