पक्षात कुरबुरी असतातच.. पण, सरकार मजबूत : छगन भुजबळ

पक्षात कुरबुरी असतातच.. पण, सरकार मजबूत : छगन भुजबळ

महाराष्ट्रातील सरकार हे तीन भिन्न पक्षांचे बनले आहे. पक्ष कोणताही असला अगदी एक पक्ष असला तरी प्रत्येक पक्षात कुरबुरी, वादविवाद असतातच. त्यामुळे याचा अर्थ महाराष्ट्रातील सरकार आता जाणार असा होत नाही असे सांगत राज्यातील सरकार मजबूत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. परंतु हा लेख लिहीला नसता तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.

निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसचे नेते लवकरच हे गार्‍हाणं मांडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ’सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीबद्दल भाष्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसचे नेते लवकरच हे गार्‍हाणे मांडणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आलबेल नसल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, सामनाच्या अग्रलेखातून फार कोणावर टिका केलेली आहे असे मला वाटत नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, थोडीशी कुरबुरी होते. खाट कुरकुरते आहे पण ती मजबूत आहे. हे खरंय की, करोनामुळे मंत्र्यांचा एकमेकांशी संपर्क थोडा कमी झालेला आहे. पण हे स्वाभाविक आहे. सरकारमधील तीन मंत्री करोनाबाधित झालेले आहेत. त्यामुळे जास्तवेळ कॅबिनेटमध्ये येऊ शकत नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मंत्री संपर्क साधत आहेत. त्यामुळे कदाचित कुणाला असे वाटत असेल की, आपल्याला निर्णयापासून दूर ठेवले गेले की काय, परंतू मुख्यमंत्री हे सर्व मंत्र्यांना भेटतात, चर्चा करतात, त्यांच्या सुचना जाणून घेतात. त्यामुळे या लेखातील टिकेबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही.

अर्थात त्यांनी नसते लिहीले तर बरेच झाले असते. पक्ष कोणताही असो अगदी एक पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्यात पक्षात वादविवाद हे होतातच हे तर तीन तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे थोडफार वादविवाद असणार.. पण याचा अर्थ असा नाही की, सरकार आता जाणार आहे असे अजिबात नाही. हे सरकार मजबूत आहे, त्यामुळे कोणी काळजी करू नये असेही ते म्हणाले.

First Published on: June 16, 2020 3:08 PM
Exit mobile version