CoronaVirus: म्हणून लोक रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन बसतात – जितेंद्र आव्हाड

CoronaVirus: म्हणून लोक रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन बसतात – जितेंद्र आव्हाड

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, मुंबईतील आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र राज्य सरकारने वारंवार घरी बसा आवाहन करून देखील काही जण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर फिरणाऱ्यांना खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी दम भरला आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र गरिबांना घरात बसायला जागा नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन बसतात अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका मुलाखती दरम्यान दिली. एवढेच नाही तर दक्षिण मुंबईत गर्दी दिसणार नाही कारण ते सगळे फार्महाऊसवर निघून गेले आहेत. तिथे मोठी घरे आहेत. पण किचनच घर असणाऱ्यांना काय करायचं. घरी बसायला जागा नसल्यानेच ते रस्त्यावर येऊन बसतात. मी अशा माणसांची बाजू सक्षमपणे मांडत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

हा तर पासपोर्टवाल्यांचा दोष

सगळ्यात महत्वाचे म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाडा यांनी पासपोर्ट वाल्यांना दोष देत हा रेशन कार्डवाल्यांचा नाही तर पासपोर्टवाल्यांचा दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच हा रोग भारतात उत्पादित झालेला नसून बाहेरून आलेला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

श्रीमंत लोक आपापल्या फार्म हाऊसवर

दरम्यान आज अनेक श्रीमंत लोक आपापल्या फॉर्महाऊसवर निघून गेले आहेत. अलिबागमधील सगळे फार्महाऊस भरले आहेत. पण गरिबाला उद्याची चिंता आहे. जे १०० रुपये कमवायचो ते आता कुठून आणू याची त्याला चिंता लागली आहे. सगळे पैसे संपल्याने उद्याच्या जेवणाचे काय याची भीती त्याला सतावत असल्याचे आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनासाठी विशेष रुग्णालय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

First Published on: April 2, 2020 5:31 PM
Exit mobile version