ठाण्यातील या रहिवाशांना ३० वर्षांनी मिळणार शुद्ध पाणी

ठाण्यातील या रहिवाशांना ३० वर्षांनी मिळणार शुद्ध पाणी

शुद्ध पाणी

ठाण्यातील हाजुरी लुईसवाडी परिसरातील रहिवाशांना बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षानंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून ३ कोटी १६ लाख रूपयांची अनामत रक्कमही भरण्यात आली आहे. दरम्याम येथील नागरिकांना प्रक्रिया केलेल्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी येथील स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनी केली होती.

हेही वाचा – ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

नगरसेवकाने केली होती तक्रार

हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनेच्या माध्यमातून सुमारे २२.५० दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या ३० वर्षापासून त्यांना प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळ्यामध्ये या परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत. तसेच स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनीही या परिसरातील नागरिकांना स्वच्छ प्रक्रिया केलेले पाणी द्यावे यासाठी मागणी केली होती.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारणार

याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्तरावर गेल्या वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढाकार घेतला होता. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुचनेनुसार जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाही अंतीम टप्प्यात आली असून, येत्या काही दिवसात या परिसराला प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.

First Published on: July 16, 2019 7:40 PM
Exit mobile version