ठाण्यात मेडिकल स्टोअरमध्ये चोरट्यांने केली हत्या

ठाण्यात मेडिकल स्टोअरमध्ये चोरट्यांने केली हत्या

Thane, India - Dec.28,2019:A 26 year old man was shot dead by an unidentified robber who broke into a medical shop wherein the victim was sleeping in the slums of the Shivaji nagar area of Kalwa,India, on Saturday, December 28,2019.( Praful Gangurde/HT Photo)

ठाण्यातील कळवा पूर्वेकडील रेल्वे स्थानकानजीक शिवाजीनगर परिसरात एका मेडिकल स्टोअरमध्ये चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याने रिव्हॉलरने गोळी झाडून 26 वर्षीय कर्मचार्‍याची हत्या केल्याची घटना शनिवार(ता.28) ला पहाटे चारच्या सुमारास घडली. हा प्रकार दुकानातील सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून चोरटा दुकानाचे शटर उचकटून आता शिरला होता. या घटनेमुळे मेडिकल दुकान चालकांनी संताप व्यक्त केला असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कळवा पूर्व शिवाजीनगर येथे रामसिंग राजपुरोहीत यांचे ’वीर युवराज मेडिकल’नावाचे मेडिकल स्टोअर आहे. या दुकानात रामसिंग याचे नातेवाईक प्रेमनाथ किशोरसिंग राजपुरोहीत (26) हे कामगार काम करतात. रात्री काम संपल्यावर दुकान बंद करून प्रेमनाथ दुकानातच झोपत असत.शनिवारी पहाटे 3 वाजून 52 मिनिटांच्या सुमारास शटर उचकटून चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात शिरलेल्या चोरट्याची चाहूल प्रेमनाथ यांना लागली.तेव्हा,त्यांनी चोरट्याला प्रतिकार केला असता चोरट्याने आपल्याकडील रिव्हॉलरने गोळी झाडून प्रेमनाथ याची हत्या केली. ही हत्या चोरीच्या हेतूने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कळवा पोलिसांनी व्यक्त केला असून सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोर चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.

First Published on: December 30, 2019 1:50 AM
Exit mobile version