यंदाची निवडणूक सर्वात गलिच्छ

यंदाची निवडणूक सर्वात गलिच्छ

अभिनेता-जयवंत वाडकर

अभिनेता-जयवंत वाडकर…

मला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तेव्हापासून आजतागायत मी अनेक निवडणुका पाहिल्या. आरोप-प्रत्यारोप मी ऐकलेले आहेत. पण या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वांत गलिच्छ आणि घृणा निर्माण होईल अशी यंदाची निवडणूक मला वाटायला लागलेली आहे. मराठी माणूसच मराठी माणसावर गलिच्छ राजकारण करतो आहे.

हा जर आदर्श असेल तर लोकांनी मतदान का करावे असा प्रश्न निर्माण होतो. यावर विशेष भाष्य करावे असे मला वाटत नाही. पण मतदारांनी आपल्या अधिकाराचा फायदा घ्यायला हवा. उमेदवार, पक्ष याच्याबाबतीत आपली स्वत:ची काही मते असतील तर ती बाजूला ठेवून कोणालाही मतदान करा , पण कराच. गेल्या काही वर्षातील राजकारण लक्षात घेतले तर शिवसेना हा पक्ष मला योग्य मार्गाने जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी मित्रपक्षाची केलेली निवड देशाच्या हितासाठी फायदेशीर ठरलेली आहे. सत्तेवर असलेल्या सरकारने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले ते सामान्य माणसांच्या हिताचे आहेत. ते भविष्यात जाणवेल यावर माझा विश्वास आहे.

जी एस टी लागू केल्याने सरकारच्या तिजोरीत पैसे जमा होत आहेत. इन्कम टॅक्स सारखे कडक निर्बंध लावल्याने काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी कमी प्रमाणात होत होत्या त्या आता चार पटींनी वाढलेल्या आहेत. आर्थिक घोटाळा करणार्‍यांना याचा वचक बसत असल्याचे जाणवते.

First Published on: April 17, 2019 4:56 AM
Exit mobile version