युटीएस अँपच्या माध्यमातून दररोज ८१ हजार तिकीटे

युटीएस अँपच्या माध्यमातून दररोज ८१ हजार तिकीटे

युटीएस अ‍ॅप

रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरिल वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोईसाठी रेल्वे प्रशासनाद्वारे युटीएस अ‍ॅप सुरू करण्यात आले होते. दिवसेंदिवस हे युटीएस अ‍ॅप प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या युटीएस अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ८१ हजार तिकीटे काढले जात असल्याचे समोर आले आहे. एकूणच या अ‍ॅपचा वापर प्रवाशांकडून वाढला असून तिकीट खिडक्यांवरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका होत प्रवास सुखकर होत आहे.

तिकिट खिडक्यांवरील रांगा आणि वेळेची बचत यासाठी २०१५ मध्ये युटीएस अ‍ॅप सुरू करण्यात आला. या अ‍ॅपद्वारे एप्रिल २०१७ ला युजर्सची एकूण संख्या ३ लाख ७४ हजार होती. मात्र मध्य रेल्वेने यायूटीएस मोबाईल अ‍ॅपची लोकप्रिय वाढविण्यासाठी मिशन मोड या अ‍ॅपची जनजागुती मोहीम राबविली.

या मोहिमेमुळे जून २०१९ मध्ये युटीएस अ‍ॅप युजर्सची असलेली ६ लाख २३ हजार ३०८ इतकी संख्या ऑगस्टपर्यंत ८ लाख १५ हजार २२९ इतकी झाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सरासरी १२ लाखापर्यंत पोहचली आहे. मोबाईल तिकिटांमध्ये गेल्या सहा महिन्यांत यूटीएस अ‍ॅपचा वापर करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मोबाइल अ‍ॅपवर तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागतो.

First Published on: December 9, 2019 1:06 AM
Exit mobile version