पनवेलमध्ये शाळेच्या आवारामध्ये टाईमर बॉम्ब सापडल्याने खळबळ

पनवेलमध्ये शाळेच्या आवारामध्ये टाईमर बॉम्ब सापडल्याने खळबळ

शाळेच्या आवारामध्ये टाईमर बॉम्ब सापडल्याने खळबळ

नवी मुंबईतील एका शाळेच्या आवारामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढल्यामुळे खळबळ उडाली आहे. पनवेल -कळंबोली येथील सुधागड शाळेच्या आवारात ही वस्तू सापडली आहे. कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही वस्तू टाईमर बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर खाली केला आहे. दरम्यान, या बॉम्बला निकामी करण्यासाठी बॉम्ब स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

टायमर बॉम्बला एका मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले असून बॉम्ब स्कॉड हे या बॉम्बला निकामी करण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज शाळेचा पहिला दिवस होता. शाळेमध्ये विद्यार्थी देखील दाखल झाले होते. सुधागड शाळेमध्ये देखील पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. अशातच शालेच्या आवारामध्ये बॉम्ब असल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर रिकामा केला. सध्या बॉम्ब पथक बॉम्ब निकामी करण्याचे काम करत आहे.

‘शाळेच्या आवारामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू होती. एका पिशवीमध्ये थर्माकॉलमध्ये एक लाल कलरचा बॉक्स होता. तो खोल्यानंतर त्यामध्ये एक सिमेंटचा पॅक होता. त्यामध्ये दोन वायर निघाल्या तसंच त्यामध्ये एक घड्याळ लावले होते. घड्याळामध्ये अलार्म १ वाजताचा लावला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आम्ही शोध घेत आहोत. ही वस्तू काल रात्री ठेवण्यात आली होती. या बॉक्समध्ये नेमकं काय आहे. बॉम्ब आहे की काय तो खोलण्याचा प्रयत्न सुरु आहेत. जर तो बॉक्स पूर्ण सिमेंटचा असेल तर हा कोणाचा तरी खोडसाळपणा आहे. तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल.’ – संजय कुमार, नवी मुंबई पोलीस कमिशनर

First Published on: June 17, 2019 6:22 PM
Exit mobile version