Coronavirus : टिटवाळा कोरोना मुक्त!

Coronavirus : टिटवाळा कोरोना मुक्त!
टिटवाळा शहरातील एकमेव कोरोना बधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेली महिला योग्य त्या उपचारानंतर आज पूर्णपणे बरे होऊन रविवारी सकाळी १० वा. सुमारास घरी आल्यानंतर घरच्या परिसरात प्रवेश करताच त्या महिलेला सुखद धक्काच बसला. परिसरातील बरेच जण बाहेर उभे होते आणि तिचे टाळ्या वाजवून, फुलांचा वर्षाव, करीत शंखनाद स्वागत करीत होते. तिने देखील हे स्वागत हात जोडून स्वीकारले. स्वागत करताना सोशल डिस्टन्स पाळले गेले.
टिटवाळा पूर्वेकडील परिसरात राहत असलेली सदर महिला ही कस्तुरबा रुग्णालय येथे परिचारिका म्हणून काम करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी २१ मार्चनंतर येथेच राहत होती. यावेळी  या रुग्णांची सेवा करत असताना ही महिला स्वतः बाधित झाली.  सुरुवाती (लॉकडाऊन) पासून रुग्णालयातच होत्या. तिथे कार्यरत असतानाच बाधित झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्या कस्तुरबा रुग्णालयातच दाखल करण्यात आले. त्यामुळे टिटवाळा शहरात त्यांचा कोणाशीच संपर्क आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच योग्य ती काळजी घेतल्यास शासनाच्या आदेशाचे पालन केल्यास आपण या आजाराशी सहजरित्या दोन हात करू शकतो, असे ही त्यांनी सांगितले.
यावेळी सोसायटीमधील उपस्थित नागरिकांनी “ तुम्ही आमच्या कुटुंबातल्या त्यामुळे मनात कुठलाही संकोच आणू नका , आमचे सर्वोतोपरी तुम्हांला सहकार्य असेल तुम्ही समाजाची सेवा करता करता मृत्युच्या दाढेतून बाहेर आला आहात. त्यामुळे आम्हाला तुमची नकीच कदर आहे.” असे म्हणताच सदर महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले .
आज सदर महिला पूर्णत: बरी होऊन घरी आल्यानंतर  स्थानिक नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी व सादर महिला  राहत असलेल्या सोसायटी मधील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून तसेच टाळ्या वाजवत  तसेच शंखनाद करून त्यांचे स्वागत केले या वेळी उपेक्षा भोईर यांनी नागरिकांना आवाहन  केले की दिवसेंदिवस क. डों. म. पालिकामध्ये रुग्णांची वाढ होत आहे तरी सर्वांनी घरातच राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे तुम्हाला ज्या काही अत्यावश्यक सेवेचा पुरवठा लागत असेल ते आम्ही शक्य झाल्यास घरपोच किंवा तुम्ही राहत असलेल्या परिसरात जवळपास उपलब्ध करून देऊ आत्ता आपल्या टिटवाळा शहरात कोरोना बधितांचा आकडा शून्य आहे मात्र तरीही सर्वानी घरात रहा, सुरक्षित रहा अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेश यावेळी दिला.
First Published on: April 20, 2020 8:10 PM
Exit mobile version