बेस्ट जुन्या बसगाड्या बनणार फिरते शौचालये

बेस्ट जुन्या बसगाड्या बनणार फिरते शौचालये

प्रातिनिधिक छायाचित्र

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असताना बीएमसीने बेस्टच्या भांगारात गेलेल्या बसेसचे फिरते शौचालय तयार करण्याच्या निर्णयावर गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत चांगल्याच गदारोळ झाला. विरोधकांनी अक्षरश: गोंधळ घातला. या मुद्याला धरून बेस्ट प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत महापालिका आणि बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर बेस्ट समिती सदस्यांकडून प्रचंड कडक शब्दांत टिकाटिप्पणी करण्यात आली. महापालिकाच्या सभेत भंगारात निघाल्या बेस्ट बसगाड्यांचे फिरते शौचालयात रुपांतर करण्याचा ठरवा आणला होता. त्यावरून बेस्ट समिती सदस्य व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी विरोध करत मुंबईच्या ऐतिहासिक बेस्टचा अशी अवहेलना आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात बेस्ट प्रशानला आणि महापालिका प्रशासनाला ठणकावून सांगितले. त्यांच्या या मुद्यावर बेस्ट समितीच्या सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी पाठींबा देण्यात आला. या मुद्यावर बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले की, सर्वप्रथम हा ठराव काय आहे हे पहावे लागले. त्यानंतर यावर चर्चा करणे योग्य होईल. मात्र यावरून बेस्ट समितीमध्ये भाजप आणि काँगेस सदस्यांकडून सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.

भाटिया बागत बेस्टची ऐतिहासिक ट्राम
बेस्ट संग्रहालय, आणिक आगार येथील मोडकळीस आलेल्या जुन्या ट्रामची महानगर पालिकेच्या खर्चाने नव्याने बांधणी करून ट्रामला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भाटिया बागेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच, नवीन पिढीला ट्रामविषयी त्याच प्रमाणे मुंबईच्या इतिहासाची जाणीव करून देणे या मागील हेतू आहे. या मोडकळीस आलेल्या जुन्या ट्रामची नव्याने बांधणी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या ट्रामची बांधणी करण्यासाठी १५ लाख ७३ हजार ३३० रुपयाची मजूर महापालिकाने दिली आहे. मात्र महापालिकेच्या निर्णयावर बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी स्वागत केले.

First Published on: February 16, 2019 4:09 AM
Exit mobile version