प्रजासत्ताक दिनी असे असेल वाहतूक व्यवस्थापन

प्रजासत्ताक दिनी असे असेल वाहतूक व्यवस्थापन

प्रजासत्ताक दिनी सुट्टीही असते, त्यामुळे अनेक जण काही कामानिमित्त आणि फिरण्यासाठी बाहेर पडतात. पण उद्या वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी एक दिवसासाठी वाहतुकीचे खास नियोजन केले असून, याची नियमावली जारी केली आहे. वाहतूक मार्गात काय बदल करण्यात आले आहेत आणि अन्य काय नियमावली आहे जाणून घेऊयात.

मुंबईतील (Mumbai) दादरजवळील शिवाजी पार्काजवळील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी (Police) दिलीय. वाहतूक पोलिसांनी (Police) अधिसूचनेत म्हटले आहे की, २६ जानेवारीला दादरच्या (Dadar) शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनी परेड आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सकाळी ६ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रजासत्ताक दिनी १२ तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

वाहतूक व्यवस्थापन कसे आहे?

1) एन. सी. केळकर रोड आणि केळुस्कर रोड एल. जे. रोड जंक्शन (गडकरी जंक्शन) पासून दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

२) केळुस्कर रोड पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग राहणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरील वाहतूक या मार्गाने येण्यास परवानगी असेल.

३) केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजव्या वळणाकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग असेल.

४) एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंतचा एकेरी मार्ग असेल.

५) स्वातंत्र्यवीर सावरकर रस्ता हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत एकेरी मार्ग असेल.

६) सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना डावीकडे वळण घ्यावे लागणार आहे. अर्थात वाहने गोखले रोड-गडकरी जंक्शन-एलजे रोड-राजा बडे चौक मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील

७) येस बँक जंक्शन ते सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना वाहतुकीस प्रवेश नसणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना उपलब्ध पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

First Published on: January 25, 2023 7:46 PM
Exit mobile version