लवकरच सर्वांसाठी रेल्वे धावणार; आज राज्य सरकार आणि रेल्वेची बैठक

लवकरच सर्वांसाठी रेल्वे धावणार; आज राज्य सरकार आणि रेल्वेची बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा देणारे सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान सर्वसामान्यांना लोकलने कधी प्रवास करता येईल, हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्यावर कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित असलेली रेल्वे प्रवास सेवा लवकरच सर्वसामान्यांनाही मिळण्याचे संकेत आहेत. या संदर्भात आज रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात आज महत्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान महिलांसाठी लोकल सुरू झाली असल्याने आता सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

आजपासून महिलांसाठी लोकल प्रवास

सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यावरून गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा मंगळवारी सुटला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २१ ऑक्टोबरपासून सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देत असल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्यामुळे आजपासून सर्व महिलांना रेल्वेप्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्यानुसार, सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर शेवटची उपनगरी रेल्वे सुटेपर्यंत सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल. या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे फक्त तिकीट ग्राह्य़ धरले जाईल. त्यांना क्यूआर कोड ई-पासची आवश्यकता देखील नसणार आहे.

महिला विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय

पश्चिम रेल्वेने महिला विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. याआधी दोन महिला विशेष रेल्वे फेऱ्या सुरू होत्या. बुधवारपासून आणखी चार महिला विशेष रेल्वे फेऱ्या वाढणार आहे. विरार येथून सकाळी ८.५५ वाजता, त्यानंतर सकाळी ९.४९ वाजता रेल्वे चर्चगेटसाठी सुटेल. चर्चगेट येथून सायंकाळी ६.५५ वाजता आणि रात्री ७.४० वाजता विरारसाठी रेल्वे सुटणार आहे. या फे ऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फे ऱ्यांची एकू ण संख्या ७०० वरुन ७०४ होईल. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी ते कल्याण आणि पनवेल मार्गावर चार महिला विशेष रेल्वेगाडय़ा सुरू आहेत.


आजपासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी

First Published on: October 21, 2020 8:35 AM
Exit mobile version