ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत; पनवेल दरम्यान तांत्रिक बिघाड

ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत; पनवेल दरम्यान तांत्रिक बिघाड

ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत

सलग चार दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असताना आज पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. ऐन गर्दीच्या वेळी आज ट्रान्स हार्बरवर मार्गावरील पनवेल स्थानका दरम्यान तांत्रिकवर बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पनवेलच्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होती. मात्र, आता तांत्रिक बिघाड दूर झाल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल खोळंबली

आज सकाळी दहाच्या सुमारास पनवेलच्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेचा खोळंबा सुरु असताना चार दिवसांपासून कल्याण – ठाकुर्ली स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० ते ३० मिनिटे उशीराने सुरु होती. पहाटे सातच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कार्यालयात निघालेल्या नोकरदारांची मोठी कोंडी झाली होती. तर दोन दिवसांपूर्वी नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती.

First Published on: June 21, 2019 11:25 AM
Exit mobile version