रस्त्यावर दिवाळीतील कचर्‍याचे ढीग

रस्त्यावर दिवाळीतील कचर्‍याचे ढीग

शहरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, फटाक्यांचा कचरा, मिठाईचे बॉक्स, निर्माल्य आदी कचरा बेशिस्तपणे नदीच्या किनारी, रस्त्यावर, फुटपाथवर टाकून दिल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. उल्हासनगर 3 मधील 17 सेक्शन, हिराघाट रस्त्यांच्या बाजूला, शाहू महाराज उड्डाण पुलाजवळ ठिकठिकाणी तसेच वालधुनी नदीच्या किनारी कचर्‍याचे ढीग लागलेले आहेत.

उल्हासनगर मनपातर्फे कचरा उचलण्याचे कंत्राट कोणार्क कंपनीला देण्यात आलेआहे. कचरा उचलणार्‍या गाड्या आणि कंपनीचे सफाई कर्मचारी कचरा उचलण्यास येत नाहीत तसेच मनपाचे सफाई कर्मचारी व अधिकारी हे दिवाळी साजरी करण्यात व्यग्र असल्याने कचरा उचलण्यासाठी कोणाकडेच वेळ नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत .

दिवाळीमध्ये दुप्पट कचरा निर्माण होतो. त्यामुळे कचरा उचलण्याचे काम देखील दुपटीने वाढले आहे. उपलब्ध यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. काही दिवसातच शहर पुन्हा स्वच्छ दिसेल.
-विनोद केणी, मुख्य स्वच्छता निरीक्षक

First Published on: November 1, 2019 1:11 AM
Exit mobile version