धूर येत असल्याचे पाहून प्रवशांनी मारल्या लोकलमधून उड्या

धूर येत असल्याचे पाहून प्रवशांनी मारल्या लोकलमधून उड्या

हर्बर मार्गावरील वडाळा स्थानकावर उभ्या लोकलमधून एअरप्रेशरमुळे ब्रेकमुळे धूर निघाला. हे पाहून अनेक प्रवाशांनी लोकलमधून उडी घेतली. यात एका तरूणीने उडी घेतल्यामुळे ती जखमी झाली. या तरूणीवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हर्बर मार्गावर सीएसएसटीडून पनवेलला जाणारी लोकल वडाळा स्थानकात फलाट क्रमांक एकवर आली. लोकल प्लॅटफॉर्मवर थांबली असता. एअरप्रेशरमुळे धूर निघाला. अचानक धूर निघू लागल्यामुळे अनेक प्रवाशांनी लोकलमधून उडी मारली. यात अनेकांचे मोबाईल पडले. यावेळी ट्विटकल बेन्निकडी या २२ वर्षीय तरूणीने लोकलमधून फलाटावर उडी घेतली. यात जखमी झाली अशी माहिती रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के.के. यांनी दिली.

First Published on: January 10, 2020 9:11 AM
Exit mobile version