दारुबंदीसाठी पालघरमध्ये आदिवासी महिलांचा मोर्चा

दारुबंदीसाठी पालघरमध्ये आदिवासी महिलांचा मोर्चा

पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल जव्हार तालुक्यातील तलासरी रोजपाडा येथील महिलांनी गावातील व्यसनमुक्तीसाठी दारुबंदी करता जनजागृती मोर्चा काढला होता. जव्हार तालुक्यापासून जवळजवळ 25 कि.मी असलेल्या रोजपाडा पो. साखरशेत येथील आदिवासी पाड्यात वयम चळवळीच्या पेसा गाव माध्यमातून महिलांनी हा मोर्चा काढण्यात आला होता.
रोजपाडा हे 72 कुटुंबांचे लोकवस्तीचे लहानसे गाव आहे. गावात शांतता नांदावी, भांडण तंटे मिटावेत या उद्देशाने पेसा गाव तलासरी रोजपाडा येथे महिलांच्या प्रयत्नांने 10 फेब्रुवारी 2020 ला गावकीची ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा ठराव पास करण्यात आला होता. त्याआधारे गावात शांतता कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.

त्यानंतर महिलांनी एकत्र जमून गावात दारुबंदीसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीतील महिलांनी दारु बंद करुन गावात शांताता ठेवण्याचे फलक हाती घेतले होते. या दारुबंदी मोर्चात महिलांसह पुरुषही सहभागी झाले होते. दारुबंदी मोर्चा यशस्वी करण्यासाठी शांतता समितीच्या सुमन बोबा, आसम्या रोज, प्रमिला पागी, संजु रोज, रुक्सना रोज, बिजली सुरुम, सुनील रोज, मिना रोज, शांती रोज, पोवनी रोज, सुलंती रोज या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

First Published on: February 12, 2020 2:19 AM
Exit mobile version