व्हॉट्सअपवरुन तिहेरी तलाक; पतीसह सासूसासऱ्यांवर गुन्हा

व्हॉट्सअपवरुन तिहेरी तलाक; पतीसह सासूसासऱ्यांवर गुन्हा

व्हॉट्सअपवरुन तिहेरी तलाक

शहरात मागील आठवड्यात गाजत असलेल्या व्हॉट्सअपवरील मेसेजच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पती, सासू – सासरे या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भिवंडी येथील कल्याण कोळसेवाडी येथे राहणारी आरजू ही महिला आपल्या पती सोबत राहत होती. मात्र तिच्या लग्नानंतर आरजू हिचा पती नदीम सासू आयशा आणि सासरे यासिन शेख यांनी हुंड्यासाठी मानसिक तसेच शारीरिक छळ सुरु केला. तसेच तिच्या माहेरहून पैसे देखील आणण्यास सांगितले. मात्र त्याला तिने नकार दिल्याने तिला व्हॉट्सअपवर तलाक तलाक तलाक असा मेसेज करुन तिला तलाक दिल्याचे कळविले. याप्रकरणी आरजूच्या सासरच्या माणसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ठिकाणी पीडित महिला

भिवंडी येथे राहणाऱ्या आरजू या महिलेचा २०१४ मध्ये नदीम याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी आरजू हिला तिच्या माहेराहून पैसे आणण्याचे देखील सांगितले होते. मात्र त्याला तिने नकार दिल्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. मात्र ती पैसे आणत नसल्याचे पाहून तिला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर तिचा पती नदीम यांनी तिला व्हॉट्सअॅपवर तलाक तलाक तलाक असा मेसेज करून तिला तलाक दिल्याचे कळविले. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन पंडित महिलेला दिले होते. त्यानंतर १४ मे रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून पती नदीम आणि उत्तरप्रदेश येथे राहणारे सासूसासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

First Published on: May 15, 2019 9:09 PM
Exit mobile version