चेंबूरमध्ये शौचालयाच्या टाकीत ट्रक फसला; तीन जण अडकले

चेंबूरमध्ये शौचालयाच्या टाकीत ट्रक फसला; तीन जण अडकले

ट्रक टाकीत फसला

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन महिला टाकीत पडल्याचे समजते. मरियम शेख (वय ११) आणि अरुणा मांडवकर (वय ३०), असे या दोघींची नावं आहेत. मरियम सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून अरुणा यांनी तब्येत प्रकृती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केवळ या दोघीच टाकीत सापडल्या असून आणखी कुणीही यामध्ये पडले नसल्याचे समजते.


चेंबूरच्या वाशीनाका येथे शौचालयाची टाकी खचल्याने टाकीवर उभा असलेला ट्रक त्यात फसला आणि या टाकीत दोन ते तीन जण अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षारधक घटनास्थळी दाखल झाले. प्रथम या टाकीत अडकलेल्या एका महिलेला बाहेर काढण्यात यश आलं असून इतरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि आरसीएफ पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सर्वांनाच सुखरुप या टाकीतून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, टाकीत अडकलेला एक मुलगा जखमी झाला आहे. या शौचालयाशेजारी शिवसेना नगरसेविका अंजली नाईक यांच्या निधीतून वाचनालयाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सकाळी ट्रक जात असल्याने त्याचे चाक खचले आणि त्यासोबत जवळच्या शौचालयाची टाकी खचली.

माजी खासदार घटनास्थळी

चेंबूरच्या वाशीनाका येथील म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेफ्टिक टँक खचली. या टाकीवर उभा असलेला ट्रक त्यात फसला असून या टाकीत दोन ते तीनजण पडले. या दुर्घटनेची ही माहितीच मिळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी जाण्याकडे रवाना झाले आहेत.

First Published on: April 3, 2019 1:52 PM
Exit mobile version