मुंबई विमानतळावरही तृप्ती देसाईंना रोखलं

मुंबई विमानतळावरही तृप्ती देसाईंना रोखलं

तृप्ती देसाईविरोधात मुंबई विमानतळाबाहेर आंदोलन

केरळच्या प्रसिध्द सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतरही मंदिरामध्ये महिलांना प्रवेश करण्यास विरोध केला जात आहे. याविरोधामुळे संतापलेल्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी केरळमध्ये गेल्या. मात्र त्याच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी त्यांना विमानतळाबाहेर येऊन दिले नाही. १२ तास कोची विमानतळावर ठिय्या मांडून बसलेल्या तृर्ती देसाई आंदोलकांचा विरोध पाहून शेवटी मुंबईत परतावे लागले. त्या मुंबईत आल्या खरं मात्र त्यांना मुंबई विमातळाबाहेर ही विरोध करण्यात आला. शबरीमाला प्रथा समर्थकांनी तृप्ती देसाई यांचा निषेध नोंदवला.

असा केला विरोध

शबरीमाला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तृप्ती देसाई या १६ नोव्हेंबरला रात्री केरळला गेल्या. शुक्रवारी पहाटे त्या कोची विमातळावर पोहचल्या. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केरळ सरकराने त्यांना विमातळावरच रोखले. तर दुसरीकडे कोची विमानतळाबाहेर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मंदिराकडे त्यांना जाऊन दिले आहे. एका आंदोलकाने जर तृप्ती देसाी परत गेल्या नाही तर त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावे लागेल असा इशारा दिला होता. कोची विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या टॅक्सी चालकांनी देखील तृप्ती देसाई यांना मंदिराकडे नेण्यास नकार दिला.

दर्शन न घेताच यावे लागले

भाजपचे नेते एम एम गोपी यांनी सांगितले की, तृप्ती देसाई यांना कोची विमानतळाच्या बाहेर पोलीस तसंच दुसऱ्या कोणत्याच सरकारी वाहनाचा वापर करुन दिला जाणार नाही. जर तृप्ती देसाई विमानतळाबाहेर आल्या तर त्यांच्याविरोधात सर्व रस्त्यावर आंदोलन केले जाईल असे आंदोलकांनी सांगितले होते. तसंच सकाळपासूनच कोची विमानतळावर ठिय्या देऊन बसल्या होत्या. शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण परत जाणार नाही असे तृप्ती देसाईंनी सांगितले होते. मात्र आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले.

पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद नाही

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र शबरीमाला मंदिर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांनी मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध केला होता. मंदिरात महिलांना प्रवेश न दिल्यामुळे तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी १७ नोव्हेंबरला शबरीमाला मंदिरात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र केरळ सरकारकडून काहीच उत्तर आले नाही.

First Published on: November 17, 2018 12:54 PM
Exit mobile version