पिण्याच्या गढुळ पाण्याविरोधात नागरिकांचे आंदोलन

पिण्याच्या गढुळ पाण्याविरोधात नागरिकांचे आंदोलन

पिण्याच्या गढुळ पाण्याविरोधात नागरिकांचे आंदोलन

उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याच्या जिर्ण जलवाहिन्या गंजुन लिकेज झाल्या आहेत. त्यात गटाराचे पाणी मिसळून ते नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. त्यामुळे गेले दोन तीन दिवस संभाजी चौक, सुभाष टेकडी, कुर्ला कँप परिसरात पिण्याचे पाणी पिवळसर, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त येत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी बुधवारी, आज कँप ५ येथील वाँटर सप्लाय कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीखाली सकाळी ८ वाजल्यापासून धरणे आंदोलने केली.

४०० कोटी सांडपाण्यात गेले

या झोपडपट्टी विभागात एकतर पिण्याचे पाणी अनियमित येत असून त्यातही अत्यंत गढुळ, घाण आणि दुर्गंधी युक्त पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उल्हासनगरला पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेने कोनार्क कंपनीला ४०० कोटी रुपये देऊनही त्याची उधळपट्टी झाली. हा निधी सांडपाण्यात गेला, अशी टिका असरोंडकर यांनी यावेळी केली आहे. यावेळी पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे हे प्रतिसाद देत नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा अभियंता राजेश वानखेडे यांना धारेवर धरले आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे होत लिकेज काढण्याचे काम सुरु झाले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक सतरामदास जेस्वानी, नगरसेवक भरत गंगोत्री, समाजसेवक महादेव बगाडे, संजय वाघमारे, अँड कल्पेश माने यांनी सहभाग घेतला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम दुपारी सुरु झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


हेही वाचा – पुढील तीन वर्षात ‘म्हाडा’तर्फे पाच लाख घरांची निर्मिती


 

First Published on: January 29, 2020 7:18 PM
Exit mobile version