धक्कादायक ! मुंबईत २३ टक्के बालकं कुपोषित

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सर्वेक्षणानुसार शहरात अजुनही २३ टक्के कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मुलं दोन वर्षांखालील आहेत. यातील अर्ध्याहून जास्त बालकं जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यात आईच्या दूधापासून पूर्णतः पोषण न मिळाल्याने कुपोषित राहिले असल्याचे सर्वेक्षणानुसार स्पष्ट झाले आहे.

तब्बल तीन वर्षातील संशोधनानंतर राज्य सरकार आणि टाटा मेमोरिअलने संयुक्तरित्या हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील दोन वर्षाखालील मुलांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार मुंबईपेक्षा छोट्या शहरातील मुलं जास्त सुदृढ असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील अर्भकं आणि बालकांमध्ये २३ टक्के कुपोषितांचा समावेष असून हा आकडा राज्यातील इतर शहरांच्या आकडेवारीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. तज्ञ्जांच्या माहितीनुसार केवळ आदिवासी आणि खेडेगावातील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असते, हा दावा या सर्वेक्षणानंतर फोल ठरते.

मुलांच्या वाढत्या कुपोषणाला तेथील भौगोलिक परिस्थिती, दूषित पाणी आणि अस्वच्छता या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत, असे सर्वेक्षणात सहभागी असलेल्या Committed Communities Development Trust चे प्रमुख गिरिश आंबे यांनी म्हटले आहे.

असे केले सर्वेक्षण
हजार दिवसांत पूर्ण केले सर्वेक्षण
शहरातील ३२ हजार २५८ मुलांची केली चाचणी
मुंबई, नाशिक, नागपूर आणि मालेगाव या शहरांचा समावेश
मुंबईतील खार आणि सांताक्रूझ परिसरातील ६ हजार ३१६ बालकांची झाली तपासणी. सर्वाधीक लोकवस्ती असलेल्या या परिसरात कुपोषित मुलांची संख्या १७० इतकी आहे

First Published on: May 25, 2018 2:25 PM
Exit mobile version