शिपींग कंपन्याचे बोगस दस्तावेज बनविणार्‍या दोघांना अटक

शिपींग कंपन्याचे बोगस दस्तावेज बनविणार्‍या दोघांना अटक

संशयातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

शिपींग कंपन्याचे बोगस दस्तावेज बनविणार्‍या दोघांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍याीं अटक केली. या दोघांनी आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कार्तिकेयन रामास्वामी आणि कालिदास नटराजन अशी या दोघांची नावे आहेत. यातील कार्तिकेयनविरुद्ध अशाच काही गुन्ह्यांची नोंद असून त्याला एका गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगतले. मुंबई शहरात विदेशात नोकरीसाठी इच्छुक तरुणांना बोगस दस्तावेज बनवून देणारी टोळी कार्यरत असून या टोळीतील काही सदस्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोगस दस्तावेज देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट आठच्या अधिकार्‍यांन तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे कार्तिकेशन रामास्वामी आणि कालिदास नटराजन असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही मूळचे तामिळनाडूचे रहिवाशी आहेत. त्यांच्यासोबत इतर तीन तरुण होते. या तिघंनाही लंडन येथे नोकरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांनाच बोगस दस्तावेज देण्यासाठी ते दोघेही आले होते. प्राथमित तपासात या टोळीने लंडन आणि भारतीय शिपींग कंपनीच्या बोगस दस्तावेज बनवून अनेक तरुणांची फसवणुक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद असून त्यातील एका गुन्ह्यांत कार्तिकेशनला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. नोकरीच्या आमिषाने या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आले होते, मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी दिली नव्हती. या तरुणांना विश्वास बसावा म्हणून ही टोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बोलावित होती.

First Published on: November 9, 2019 1:04 AM
Exit mobile version