दोन बंधूवर तलवारीने प्राणघातक हल्ला

दोन बंधूवर तलवारीने प्राणघातक हल्ला

प्रातिनिधिक छायाचित्र

वैमनस्यातून दोन बंधूंवर त्यांच्याच परिचित व्यक्तीने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी बोरिवली परिसरात घडली. याहल्ल्यात सुबेत मोहन नागवेकर आणि दिपेश मोहन नागवेकर असे दोघेही जखमी झाले असून त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या 43 वर्षांच्या आरोपीस कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता बेारिवलीतील देवीपाडा, मित्रत्व सीएचसी सोसायटी इमारतीसमोरील मैदानात घडली. याच इमारतीच्या डी/603 मध्ये सुबेत हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून दिपेश हा त्याचा मोठा भाऊ आहे.

आरोपी हा त्यांच्या परिचित असून तोदेखील याच परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादाचा सूड घेण्यासाठी रविवारी सायंकाळी त्याने सुबेत आणि दिपेश यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु असतानाच आरोपीने त्याच्याकडील तलवारीने या दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला होता. जखमी दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, ही माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुबेत याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

First Published on: August 27, 2019 1:28 AM
Exit mobile version