मुंब्रा बायपासवर दोन कंटेनरला अपघात

मुंब्रा बायपासवर दोन कंटेनरला अपघात

मुंब्रा बायपासवर दोन कंटेनरला अपघात

मुंब्रा बायपास रोडवर कंटेनरला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ५ वाजता मुंब्रा बायपास रोडवरील घाटामध्ये दोन कंटेनर एकमेलांना आदळून घरावर कोसळले. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत तर घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त कंटेनर हरियाणा आणि गुजरातचे आहेत.

मार्गावर वाहतूक कोंडी

मुंब्रा देवी मंदिराच्या समोरील हनुमान मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली आहे. ही दुर्घटना मुंब्रा देवी मंदिराच्या समोरील हनुमान मंदिराजवळ घडली आहे. घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे या मार्गावरील वरील वाहतूक एकेरी सुरु करण्यात आली आहे. पोलीस, पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन्ही कंटेनर काढण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First Published on: November 26, 2018 9:36 AM
Exit mobile version