दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही – नाना पटोले

दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही – नाना पटोले

दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही अशा शब्दातच विधानसभा अध्याक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारचे आज कान टोचले. इतर राज्यातही ८ दिवसांचे अधिवेशन होत आहे. अशावेळी अवघ्या दोन दिवसातल्या अधिवेशनाने जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवर टिप्पणी केली. विधानसभेच्या कामकाजाला पहिल्या दिवसाची सुरूवात झाल्यानंतर रवि राणा यांच्या फलकबाजीनंतर त्यांनी हे मत सभागृहात बोलताना मांडले.

राज्यातले प्रश्न अनेक आहेत. आमदारांचे अधिकार आणि जनतेचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. म्हणून सरकारला विनंती विरोधी पक्ष आणि सरकार यांनी बसून नियमावली करा. सोशल डिस्टन्सिंग घेऊन नियमावली तयार करावी. दोन दिवसांचा वेळ अपुरा आहे. पुढचे अधिवेशन नियमित अधिवेशन होईल ही कारवाई केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

रवि राणा यांची फलकबाजी

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या रवि राणा यांची दिवाळी जेलमध्ये गेली आहे असे सांगत आज सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी याविषयावर बैठक लावावी असे म्हणणे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडले. पण सभागृहात फलकबाजी करणाऱ्या रवि राणा यांच्या कृतीवर गंभीर आक्षेप नोंदवत यापुढे अशा प्रकारचे फलक घेऊन येणाऱ्यांना सभागृहात सोडू नका असे आदेश विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिले.

First Published on: December 14, 2020 11:39 AM
Exit mobile version