बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगवरुन पडून २ कामगारांचा मृत्यू

बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगवरुन पडून २ कामगारांचा मृत्यू

मुंबईतल्या चेंबूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावरुन ४ कामगार पडले. आर के स्टूडिओच्या समोरील शबरी इंटरप्राइजेस या बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अशी घडली घटना

आर के स्टूडिओच्या समोर शबरी इंटरप्राइजेस या बिल्डिंगचे काम सुरु होते. या बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावर खिडकी बसवण्याचे काम सुरु होते. हे काम करत असताना ४ कामगार ११ व्या मजल्यावरुन खाली पडले. सकाळी १० वाजता ही घटना घडली. यामधील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीर जखमी झाले.

गोवंडी पोलिसांकडून तपास सुरु

याप्रकरणी जखमी कामगारांवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन कामगारांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान गोवंडी पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे. ४ ही कामगार कसे पडले, त्यांना सुरक्षिततेसाठी काय उपाय योजना केल्या होत्या की नाही याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा –

इमारतीवरुन पडून कामगाराच्या छातीतून डोक्यापर्यंत घुसली सळई

First Published on: November 30, 2018 1:07 PM
Exit mobile version