भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Abduction

भिवंडी शहर परिसरातून शाळकरी आणि कॉलेज अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना कमालीच्या वाढल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मुलींचे अपहरण झाल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत नागावमधील गायत्रीनगर येथे राहणारी बारावीत शिकणारी १७ वर्षाची कॉलेज तरुणी सोमवारी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली ती घरी परतलेली नाही. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्‍या घटनेत बाळा कंपाऊंड येथे राहणारी एक पंधरा वर्षाची मुलगी राहत्या घरातून निघून गेली असून ती देखील उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनीही शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. या दोन्हीं मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार साळुंखे करीत आहेत.

First Published on: January 30, 2019 5:35 AM
Exit mobile version