२ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत…

२ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत…

पालघर-मनोर रस्त्यावरील दहिसर फाट्याजवळ शनिवारी एक विचीत्र अपघात घडला. या अपघातात एका २ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत असून, त्याची आई आणि दोन वर्षांचा भाऊ हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पालघर-मनोर रस्त्यावरील दहिसर फाट्याजवळ हा अपघात झाला. समोर अचानक कुत्रा आल्यामुळे दुचाकीस्वाराने बाईकला तात्काळ ब्रेक लावला. यामुळे त्याची पाठीमागे बसलेली पत्नी आणि दोन मुलं रस्त्यावर फेकली गेली. याचवेळी मागून येत असलेल्या एका भरधाव कारने या तिघांनाही चिरडले. यामध्ये त्या २ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच अंत झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईवर आणि २ वर्षांच्या भावावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, या दोघांचीही परिस्थिती नाजूक आहे.

सविस्तर घटना…

शनिवारी संध्याकाळी विक्रमगड  रहिवाशी रणजीत पागी हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून पालघरच्या दिशेने येत होते. यावेळी अचानक त्यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आल्याने त्यांनी त्वरित ब्रेक लावला. हा ब्रेक इतक्या जोरात लावला गेला की,  त्यामुळे दुचाकीवर मागे आपल्या २ महिन्यांच्या बाळाला घेऊन बसलेली त्यांची पत्नी आशा आणि २ वर्षांचा मुलगा राजवीर उडून रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या एका कारने त्या तिघांनीही चिरडले. या विचित्र अपघातात काहीही चूक नसताना २ वर्षांच्या चिमुरड्या आरुषला आपले प्राण गमवावे लागले. उपलब्ध माहितीनुसार, मृत आरुषच्या जखमी आईवर पालघरच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, दोन वर्षीय राजवीरची प्रकृती खूपच गंभीर असल्याकारणाने त्याला तात्काळ सिल्वासा हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


वाचा: २४ तासांत राममंदिराचा प्रश्न निकाली काढू – योगी आदित्यनाथ

First Published on: January 27, 2019 12:56 PM
Exit mobile version